Tokyo Paralympics 2020 : भारताच्या नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

एमपीसी न्यूज – भालाफेक मध्ये भारताला नीरज चोप्रा याने सूवर्ण पदक जिंकून दिल्यानंतर आता पॅरालिम्पिकमधेही भारताला पहिले सूवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोकीयो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. 

अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 229.1 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 19 वर्षीय नेमबाज अवनीने 249.6 गुण मिळवत सुवर्ण पटकावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.