Indian Shooter Pournima Passed Away: नेमबाज पूर्णिमाचे वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने निधन

Indian Shooter Pournima dies of cancer at the age of 42 निवृत्तीनंतर पूर्णिमाने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

एमपीसी न्यूज- भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे (42) (लग्नापूर्वीची पूर्णिमा गव्हाणे) हिचे कर्करोगाने निधन झाले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त प्रशिक्षक असलेली पूर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

नांदेड येथे जन्मलेल्या पूर्णिमाने मुंबईतून आपल्या नेमबाजी कारकीर्दीला सुरुवात केली होती. पूर्णिमाने ISSF विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

तिला शिवछत्रपती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. 10 मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विक्रमाचीही तिने नोंद केली होती. निवृत्तीनंतर पूर्णिमाने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

उपचारानंतर पूर्णिमाची तब्येत सुधारली होती, असे माजी नेमबाज जॉयदीप कर्माकरने सांगितले. कनिष्ठ गटात खेळताना आमच्यात चांगली मैत्री झाली होती. तिच्या अचानक निघून जाण्याने धक्काच बसल्याचे कर्माकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.