100 Cr Vaccination : लसीकरणात भारताची मोठी झेप, 100 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज – कोरोना विरुद्ध लढाईत भारताने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, कोरोना विरुद्ध लढाईला देशाला आणखी बळ मिळाले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत देशात 100 कोटी 59 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

देशातील 29 कोटी लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर, 42 कोटी लोकांनी एक घेतला आहे. तसेच, देशातल्या 32 कोटी लोकांना अजून लसीचा एकही डोस मिळाला नसून, 42 कोटी लोकांना दुसरा डोस बाकी आहे.

देशात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.