India’s Clarification on Trump’s Tweet: चीन प्रश्नाबाबत मोदींशी चर्चा झाल्याचा ट्रम्प यांचा दावा खोटा?

India's Clarification on Trump's Tweet: Trump's claim that China issue was discussed with Modi is false?

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 4 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारचे संभाषण झाले नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे भारत-चीन संबंधांबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचा ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याशी सध्याच्या चीनशी झालेल्या वादाबद्दल बोलल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींची मनःस्थिती चीन वादाबाबत चांगली नाही, असे निरीक्षण ट्रम्प यांनी नोंदविले आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीन आणि भारत यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थीची ऑफर दिली होती.

या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, मोदी व ट्रम्प यांच्यात 4 एप्रिलला हायड्राक्सिक्लोरीक्वाईन गोळ्यांसंदर्भात झालेल्या संभाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नसल्याचे परराष्ट्र व्यवहार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारत   सातत्याने चीनच्या थेट संपर्कात असल्याचेही भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते ट्रम्प? 

_MPC_DIR_MPU_II

एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘मला पंतप्रधान मोदी खूप आवडतात. ते एक महान व्यक्ती आहेत.’  ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात मोठा वाद सुरू आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या सुमारे 140-140 कोटी आहे. भारत आणि चीनची सैन्यही खूप शक्तिशाली आहे. कदाचित भारत आनंदी नाही, कदाचित चीनही खूष नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1