India Corona Update : भारताचा कोरोना रिकव्हरी रेट 97.36 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 41 हजार 831 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 39 हजार 258 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 08 लाख 20 हजार 521 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट 97.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 एवढी झाली आहे. मागील काही दिवसांपासून बरे होणा-या रुग्णांची संख्या कमी झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांपेक्षा अधिक झाली आहे. देशात सध्या 4 लाख 10 हजार 952 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 24 हजार 351 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 541 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशात आजवर 46 कोटी 82 लाख 16 हजार 510 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 89 हजार 472 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 47 कोटी 02 लाख 98 हजार 596 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 60 लाख 15 हजार 842 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.