BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : जावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे दिमाखात उद्घाटन

आता पुन्हा धडधडणार तो दमदार आवाज....

एमपीसी न्यूज-  डोळ्यांवर गॉगल, अक्कडबाज मिशा असलेला रुबाबदार, रांगडा गडी आपल्या ऐटबाज गाडीवर मोठ्या झोकात धडधड आवाज करुन जाण्याचे दिवस आता पुन्हा दिसणार असून आत्ता जे ज्येष्ठ झाले आहेत त्यांना त्यांचे ऐन उमेदीचे दिवस पुन्हा आठवणार आहेत. अर्थात निमित्तच तसे आहे कारण या ज्येष्ठ झालेल्या तेव्हाच्या तरुणांना त्यांच्या जुन्या दिवसात पुन्हा घेऊन जाण्याचे काम करणार आहे त्यांची तेव्हाची प्रिय बाईक. कुठली म्हणून काय विचारता? तेव्हा म्हणजे साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी आत्तासारखे दुचाकींचे पीक नव्हते. तेव्हा फक्त आणि फक्त होती ती जावा.

जावा या जुन्या काळातील प्रसिद्ध मोटरसायकलची एनएसजी जावा ऑटोरायडर ही भारतातील पहिली शोरुम पिंपरी चिंचवडमध्ये गावडे इस्टेट येथे सुरु झाली असून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते तिचे आज उद्घाटन झाले. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक अमित गावडे, जावा कंपनीचे सीईओ अश्विन जोशी, तरुण शर्मा, आशिष जोशी, नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड, राहुल हनुमंत राऊत आणि वीरेंद्र हनुमंतराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मूळच्या झेक असलेल्या जावा कंपनीने भारतात १९६१ साली पहिली मोटरसायकल आणली. त्यावेळी तिच्या फटफट या आवाजावरुन ती फटफटी या नावानेच लोकांमध्ये प्रसिद्ध होती. सुरुवातीला ही गाडी लाल रंगात होती. नंतरच्या काळात तिचा काळा रंगदेखील होता. मात्र १९७१ नंतर या गाडीचे उत्पादन बंद झाले. आणि पुढे याच कंपनीच्या येझदी या गाड्या भारतात सुरु झाल्या. तेव्हा या गाड्या म्हैसूर येथील कारखान्यात तयार होत असत. सुरुवातीला पाचशे रुपये भरुन गाडीचे बुकींग करावे लागत असे आणि नंतर काही महिन्यांनी गाडी ताब्यात येत असे. पण दुस-या कोणत्याही गाड्या नसल्याने फक्त याच गाड्यांची चलती होती. हळूहळू दुस-या गाड्या बाजारात आल्या आणि नंतर जावाची निर्मिती देखील बंद झाली. पण मागील काही वर्षांपासून महिंद्रा या कंपनीच्या साहाय्याने जावा या कंपनीने पुन्हा मार्केटमध्ये उतरण्याचे ठरवले. नव्या युगाला अनुसरुन गाडीमध्ये आवश्यक ते बदल केले आणि पुन्हा बाजारात आली ती पहिली क्लासिक जावा. आत्ता जावा क्लासिक आणि जावा ४२ ही स्पोर्टी गाडी कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केली असून भारतातील पहिली शोरुम चिंचवड येथे आज सुरु झाली आहे. या गाडीचे इंजिन २९३ सीसीचे असून फ्युएल टँकची क्षमता १४ लीटर्सची आहे. तसेच मॅक्सिमम पॉवर २७ बीएचपी असून व्हीलबेस १३६९ एमएमचा आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like