Pimpri: इंदिरा गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच काँग्रेसतर्फे देखील अभिवादन करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले
आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. त्याचे वाचन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगार बारस्कर, पर्यावरण विभागाचे शहाध्यक्ष अशोक मंगल, पुण्याचे  अध्यक्ष उमेश काळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.