_MPC_DIR_MPU_III

Wakad : सीबीएसई बोर्डात इंदिरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी 

शाळेचा १०० टक्के निकाल : ईशीता जिंतूरकर राज्यात तिसरी

एमपीसी  न्यूज –   इंदिरा नॅशनल स्कुलने परंपरा कायम राखत यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षांत १०० टक्के  निकाल लावला असून ईशीता जिंतूरकर या विद्यार्थिनीने ९९% गुण मिळवून राज्यात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आयोजित गुणगौरव समारंभात सन्मान करण्यात आला.     

_MPC_DIR_MPU_IV

इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर व समूह संचालक प्रा. चेतन वाकलकर ह्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रसाद परदेशी, उप प्राचार्या स्नेहा सप्रे यांच्यासह सुनिता पाटील अवंती नामजोशी, पूनम वर्मा, अर्चना हुलावले, आकांक्षा भडगावकर हे शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

विद्यार्थ्यांचे कौतुक करताना डॉ. तरिता शंकर म्हणाल्या आपल्या सर्वांसाठी हा एक गर्वाचा क्षण आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालासह पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या व आपल्या देशाच्या भविष्यातील तरुण पिढीच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. प्राचार्य प्रसाद परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

इयत्ता १० वीच्या परीक्षेला सामोरे गेलेले सर्वच म्हणजे २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ११३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण प्राप्त केले आहेत तर १३० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी बारावी वाणिज्य शाखेच्या गुरूप्रीत भसीन (९६%) व १० वी तील ईशीता जींतूरकर (९९%) ह्या दोघी शाळेच्या शीर्ष स्थानी आहेत. १२ वीचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे – विज्ञान शाखा – अनिता जगती (९५.४%), आदिती पागे (९३.८%), आदित्य भुजबळ (९३.८%) व आयुष कामठीकर (९२.६%). ह्युमॅनिटीज- दक्ष पालिवाल (८२.२%), मिक्रा खान (७९%),करण बेल्लाड (७७%). वाणिज्य शाखा -तानिया मंगलानी (९२.४%), भानेश मनोज (९२.६%), गुरूप्रीत भसीन (९६). १० वीतील विद्यार्थी –  झील झिंजूवाडिया (९८%) निल हंडा (९८.४%) व ईशीता जिंतूरकर (९९)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.