International News : भारत – चीन सैन्यात पुन्हा संघर्ष ! 20 चिनी सैनिक जखमी 

एमपीसी न्यूज   : लडाखमध्ये लाईन ऑफ एक्चुएल कंट्रोलवर तणावादरम्यान, सिक्किममध्ये भारत आणि चीनी सेनेत संघर्ष झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाथुलामध्ये (Nathu La) चिनी सेनेने यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. तसंच भारतीय सीमेवर (Indian territory) काही चिनी सैनिक घुसखोरीच्या उद्देशाने येत होते. 

या दरम्यान झालेल्या संघर्षात (Clash in Sikkim’s Nathu La) 20 चिनी सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अद्याप दोन्ही देशांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे हवामानाची स्थिती बिकट असतानाही भारतीय हद्दीत सर्व ठिकाणी दक्षता राखली जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.