Pune News : युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वीडनची दारे खुली

ऍना लॅकवल : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंडो नोर्डीक कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज –  युक्रेन – रशिया (Ukraine & Russia)  युद्धाचा परिणाम अर्थातच संपूर्ण युरोपवर झाला आहे. मात्र आम्ही त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करत आहोत. दरम्यान युक्रेनमधील भारतीय मुलांच्या पुढील शिक्षणासाठी स्वीडनची दारे खुली असून आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन मुंबईतील स्वीडनच्या कौन्सिल जनरल ऍना लॅकवल यांनी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) 26 मे रोजी ‘इंडो नोर्डीक सर्क्युलर इकॉनॉमी अँड बायो इकॉनॉमी वर्कशॉप’ चे आयोजन केले होते, यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ऍना लॅकवल बोलत होत्या.

यावेळी झालेल्या कार्यशाळेत स्वीडन, नोर्वे, डेन्मार्क आणि फिनलँड आणि भारत या देशातील उद्योग, पर्यावरण आणि शिक्षण, संशोधन आणि बाजापेठ यांची सांगड घालत एकत्रित विकास साधण्याच्या दृष्टीने विचारविनिमय झाले.

दरम्यान, अर्ने जॅन फ्लोलो म्हणाले, जागतिक हवामान बदल हे वैश्विक आव्हान पेलताना अक्षय ऊर्जा आणि हरित साखळी या मुख्य गोष्टीला धरून तंत्रज्ञान वापरले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.