Indore : मास्क न घालता ‘फेरारी’ मधून फिरणाऱ्या तरूणाला पोलिसांनी घडवली अद्दल

एमपीसी न्यूज – देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचं संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. इंदोरमध्येही शासकीय आदेश धाब्यावर बसवत मास्क न वापरता ‘फेरारी’तून फेरफटका मारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात आवश्यक बाहेर पडू नये असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, वारंवार सांगूनही काही जण लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत नाहीत. अशा लोकांना पोलीस कुठे फटके देऊन तर कुठे उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहेत. तरीही काही उत्साही नगरीकांवर त्याचा परिणाम होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

असाच प्रकार इंदूरमध्ये घडला आहे. फेरारी घेऊन विना मास्क जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या तरुणाला पोलिसांनी अडवलं आणि मास्क का घातला नाही, याची विचारणा केली. तरुण उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला उठाबशा काठायची शिक्षा दिली आहे.

संस्कार दर्याणी असे या तरूणाचे नाव आहे. तो म्हणाला, जेव्हा मी कंपनीतून घरी परत येत होतो तेव्हा पोलिसांनी मला अडवले, मी त्यांना माझा पास दाखवला पण त्यांनी ऐकून न घेता मला सिट-अप काढण्यास सांगितले. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर मी त्यांच्या आदेशाचे पालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.