Indori : इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

तळेगाव दाभाडे- इंदोरी येथील अनेक सरकारी शाळांमध्ये व बालवाडी मध्ये आज मंगळवार (दि. २४) रोजी इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याबाबत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य. संजय तथा बाळा भेगडे. यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

या वेळी मावळ तालुका भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, मावळ तालुका माजी अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, माजी सरपंच संदीप काशिद पाटील, कामगार नेते. सुनिल चव्हाण, इंदोरी अध्यक्ष. जगन्नाथ शेवकर, दत्तात्रय काशिद गुरूजी, भाजपा युवा नेते. ऋतुराज काशिद पाटील. साईनाथ बानेकर, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष. संस्कार चव्हाण. आदी मान्यवरांसह सर्व शाळांचे प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.