Pune : इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित अडीच हजार रोपांचे वाटप

 ‘ग्रीन इयर – २०२०’ उपक्रमाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने ‘ग्रीन इयर – २०२०’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनोख्या अभियानाची सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा उद्योजक आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आली. ‘ग्रीन इयर २०२०’ ची सुरुवात करताना फाउंडेशनच्या वतीने फिनिक्स मार्केट सिटी येथे अडीच हजार रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सेक्रेटरी उत्कर्ष साळवे यांनी पुढाकार घेतला. यावेळी इंद्राणी बालन फाउंडेशनचे संचालक प्रशांत स्वामी, भाजयुमोचे राज्य सचिव अनुप मोरे,  भाजप युवती आघाडी पिंपरी – चिंचवडच्या अध्यक्षा तेजस्वीनी कदम, भाजप सोशल मीडिया पिंपरी – चिंचवडचे प्रमुख राजेश पुरोहित आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले, अलीकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे सर्वच घटकांना फटका बसत आहे. हवामानातील बदल रोखायचे असतील तर ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही ‘ग्रीन इयर २०२०’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत आम्ही लोकांना वृक्षारोपण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहोत. आज प्रजासत्ताक दिनानिमित उपक्रमाची सुरुवात केली, अडीच हजार रोपांचे वाटप करण्यामागे लोकांनी आपला परिसर हिरवागार करावा, असा आमचा हेतू आहे. फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना सातशेहून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय  इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत करण्यास आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like