Indravajra : आकाशातील ‘इंद्रवज्र’ आविष्कारामुळे संस्मरणीय ठरली नारळी पौर्णिमा 

अगदी दुर्मिळ असा असणारा हा निसर्गाचा चमत्कार आहे हा. पावसाळ्यात अतिशय क्वचित हा अनुभव घेता येतो

एमपीसी​ न्यूज ​- पिंपरी-चिंचवड व पुण्यातून आज दुपारी निसर्गाचा एक अनोखा आविष्कार पाहता आला. अगदी दुर्मिळ असा असणारा हा निसर्गाचा चमत्कार आहे हा. पावसाळ्यात अतिशय क्वचित हा अनुभव घेता येतो. ‘इंद्रवज्र’ या नावाने याला ओळखले जाते. दुपारी एकच्या सुमारास हा निसर्गाचा चमत्कार आज घडला. इंग्रजी मध्ये याला ‘हेलो’ असं नाव आहे. 

सूर्याभोवती संपूर्ण गोल आकारात एक इंद्रधनुष्य पाहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच असते. प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी  दुपारी एकच्या सुमारास चिंचवड येथून हि छायाचित्र टिपली आहेत .

याबाबत अधिक माहिती घेतली असता खगोलविश्व या संस्थेचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले कि जमिनीपासून 8 ते 9 किलोमीटरवर  आकाशात गारव्यामुळे पाण्याचा बर्फ होऊन त्याचे अतिशय लहान स्फटिक तयार होतात, या स्फटिकांमधून सूर्याची किरणे परावर्तीत झाल्याने 20 अंशाच्या कोनात जमिनीवरून हे इंद्रवज्र दिसते.

सर्व छायाचित्रे – देवदत्त  कशाळीकर 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.