Indrayani : इंद्रायणी घाटावर मांस शिजवण्याचा संतापजनक प्रकार; वारकरी संप्रदाय संतप्त

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Indrayani Ghat) पवित्र इंद्रायणी घाटावर महात्म्यांच्या समाधीपुढेच काही समाजकंटकांनी मांस शिजवण्याचे घृणास्पद कृत्य केल्याने वारकरी संप्रदायाच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे.

हि घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री इंद्रायणी नदी घाटावर घडली. या घडलेल्या कृत्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. येथील प्रशासन, राज्यकर्ते, पुढारी यांनी याबाबत दखल घेऊन असे प्रकार घडू नये यासाठी त्याचा बंदोबस्त करावा. तसेच हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी या व्हिडिओमार्फत करण्यात आली आहे.

Pimpri : नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन; भारतीय मराठा महासंघाचा इशारा

याबाबतची माहिती इंद्रायणी फाउंडेशनचे (Indrayani Ghat) पदाधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. तसेच, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलीस कारवाईबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ताशोरे ओढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.