Talegaon : इंद्रायणी महाविद्यालयास पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा समिती व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग ( मुले / मुली ) स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयास महिला व पुरुष दोन्ही गटात सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले असून डॉ. बी.एन. पुरंदरे महाविद्यालय – पुरुष गटात तर एच. आर. एम. महाविद्यालयाला महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे , अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे खजिनदार चंद्रकांतजी शेटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष रामदासजी काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, पुणे जिल्हा क्रीडा समितीचे सहसचिव प्रा. प्रतिमा लोणारी, इंद्रायणी महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे विलास काळोखे, निरूपा कानिटकर, संजीव साने आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विशाल लोंढे म्हणाले, “सहभागी खेळाडूंना स्पर्धेत यश मिळवण्यासाठी मनापासून मेहनत करण्याची गरज आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष रामदास काकडे यांनी खेळाडू घडवणाऱ्या उपस्थित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “महाविद्यालयीन स्पर्धा मध्ये मिळवलेली पारितोषिके आजही प्रेरणादायक ठरतात. त्यामुळे खेळाडूंनी नेहमी स्पर्धेतील यशासाठी प्रयनशील असावे.”

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. थरकुडे यांनी महाविद्यालयातील वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. आर. एस. आठवले आणि आभार प्रदर्शन प्रा. सुरेश थरकुडे यांनी केले.

स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे :

पुरूषगट :-
डॉ. बी.एन. पुरंदरे महाविद्यालय – सर्वसाधारण विजेतेपद
इंद्रायणी महाविद्यालय – सर्वसाधारण उपविजेतेपद

महिलागट :
एच. आर. एम. महाविद्यालय – सर्वसाधारण विजेतेपद
इंद्रायणी महाविद्यालय – सर्वसाधारण उपविजेतेपद

इंद्रायणी महाविद्यालयाच्या सौरभ कदम याने ६६ किलो वजनीगटात द्वितीय, कुंदन शिशुपाल याने ५९ किलो वजनीगटात प्रथम, वाघोले चिराग १०५ किलो वजनीगटात द्वितीय, केदार पाडे याने ९३ किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकाविला.
चेतना घोजगे हिने ५२ किलो वजनीगटात प्रथम, रुचिरा ढोरे ८४ किलो वजनीगटात द्वितीय क्रमांक पटकाविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.