Indrayani Ghat : इंद्रायणी घाटावरील स्वच्छतागृहाजवळील परिसरातच अस्वच्छता

एमपीसी न्यूज : आळंदी येथील नगरपालिका चौकासमोरील (Indrayani Ghat) इंद्रायणी घाटावरील पालिकेच्या स्वच्छता गृहाच्या जवळील असणारा नदी घाट परिसर, पालिका प्रसाशनाकडून स्वच्छ करून सुद्धा मोठ्या प्रमाणात हा परिसर वारंवार अस्वच्छ दिसून येत आहे.

काही भिक्षेकरी, मनोरुग्ण, विकृत माणसे व मद्यपी माणसे येथील घाट परिसरात शिळे अन्न मोठ्या प्रमाणात टाकतात. ते शिळे अन्न कुजून त्याची दुर्गंधी पसरते. तसेच येथील स्वच्छता गृहाचा वापर न करता काही विकृत माणसे तेथील जवळपास घाट परिसरात च शौचास जाऊन तेथील परिसर अस्वच्छ करताना दिसतात.

Chinchwad Bye Election: दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी टपाली मतदानाची सुविधा

यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. व नदी घाटावर त्या परिसराजवळून रहदारी करणाऱ्या नागरिकांना, भाविकांना, त्या अस्वच्छतेचा, दुर्गंधीचा प्रचंड त्रासही होत आहे. याबाबतची माहिती पालिका चौकातील एका नागरिकाने दिली.

येथील घाट परिसरात उघड्यावर शिळे अन्न टाकू नये याकरिता व उघड्यावर नदी घाट परिसरात शौचास बसू नये याकरिता पालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची गरज भासत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.