Dehu : हरित वारी अभियानामध्ये इंद्रायणी काठी वृक्षारोपण 

एमपीसी  न्यूज – पर्यावरण पूरक जीवनशैलीचा ऱ्हास झाल्यामुळे तसेच वृक्षसंपदा नष्ट झाल्यामुळे पर्जन्यवृष्टीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दुष्काळाची अभुतपूर्व परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. याकरिता यंदाची वारीमध्ये हरित वारी उपक्रम प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती-पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालय व जैन सोशल ग्रुप डायमंड यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. दोन दिवसांपासून देहू परिसरात, तसेच देहूरोड पोलीस ठाणे परिसरात १६० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

दोन दिवसांपासून देहू परिसरात, तसेच देहूरोड पोलीस ठाणे परिसरात १६० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यंदाच्या वर्षी ५०१ वड, पिंपळ, कडुलिंब, या देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. यामुळे १०० टक्के ऑक्सिजन निर्मितीस देहू परिसरामध्ये बळ मिळेल. पोलीस कर्मचा-यांचा मोठा सहभाग या पर्यावरण पूरक हरितवारीमध्ये देहू परिसरात प्रथमच नोंदला गेला.

_MPC_DIR_MPU_II

आजच्या हरित वारी उपक्रमामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शाहीद सय्यद पठाण, अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार आणि संतोष येडे, पोलीस कर्मचारी अशोक नवले, वैशाली लोखंडे, जैन सोशल ग्रुपचे विजय मुनोत, संतोष छाजेड प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्ष अर्चना घाळी दाभोळकर, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, संदीप सकपाळ, अँड विद्या शिंदे, राम सुर्वे, अमोल कानु, अमित डांगे, जयेंद्र मकवाना,देवयानी पाटील,कविता बोण्डे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे,तेजस सापरिया,नितीन मांडवे,मंगेश घाग,मौसमी घाळी,मदन जोशी,विशाल शेवाळे, बळीराम शेवतें, विजय जगताप, उमेश कांगुडे, कुलदीप डांगे, नाना कुंबरे, शीतल धामापूरकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी  सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते म्हणाले,”हरित वारी उपक्रमामुळे पर्यावरण शुद्धिबरोबर हरिनामामुळे आत्मशुद्धी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळावर मात करायची असेल तर, वृक्ष लागवड करणे अत्यन्त गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1