गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

एमपीसी न्यूज : मावळ भागात व धरण क्षेत्रात (Indrayani River) गेली तीन चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून जुन्या बंधाऱ्यावरून पाणी नदीपात्रात पडत आहे. जुन्या बंधाऱ्या जवळील हवेली भागातील काही डांबरी रस्ताचा भाग मागील महिन्यातील पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने तो भाग वाहतुकीसाठी लाकडी बांबूच्या सहाय्याने बंद करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने, येथील नदीपात्रा लगत असणारा दगडी घाटाचा काही परिसर पाण्याखाली गेला आहे.

spot_img
Latest news
Related news