इंद्रायणी नदी रासायनिक पाण्यामुळे फेसाळली

एमपीसी न्युज : पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने दि.4 डिसेंबर रोजी रासायनिक पाण्याने इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. आळंदी येथील जुन्या बंधाऱ्याचे काही दरवाजे उघडे असल्याने तेथून हिरव्या व पिवळसर रंगाचे मैलामिश्रीत रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात पडत असल्याचे चित्र दुपारी साडे बाराच्या सुमारास दिसून येत होते.

त्या पडलेल्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस निर्माण झालेला होता.जुन्या बंधाऱ्या खालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून गेले होते.इंद्रायणी नदी काठच्या गावातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने इंद्रायणी नदी मध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे.

Talegaon Dabhade: पोलिसात तक्रार दिली म्हणून महिलेशी गैरवर्तन

या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात येत आहेत. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपा द्वारे शेतीला नेले जाते.ते प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते.आणि त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरोगामी परिणाम होतो.ती पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येतो.

तसेच आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. अनेक भाविक रोज माऊलींच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. पूर्वी पासून इंद्रायणी नदी पवित्र म्हणून ओळखली जात असल्याने येथील पवित्र नदीपात्रात भाविक स्नान ही करतात.या प्रदूषित झालेल्या पाण्यामध्ये स्नान केल्यास विविध त्वचारोग नागरिकांना संभवतात.

इंद्रायणी नदीपात्रात जलप्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मैलामिश्रित रासाययुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे गरजेचे आहे. अशी आळंदीकर नागरीक व येथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा मागणी आहे.आज भागवत एकादशी निमित्त माऊली संजीवन समाधी दर्शनासाठी मंदीरा मध्ये गर्दी झाली होती.तसेच इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.