Pune News : इंदु राणी दुबे यांनी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्विकारला

एमपीसी न्यूज : इंदु राणी दुबे यांनी पुणे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणून पदभार स्वीकारला आहे. (Pune News) त्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या (IRTS) 1994 बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधि यांत पदवी शिक्षण घेतले आहे. याआधी त्या लखनौ येथे चीफ कमिशनर रेल्वे सेफ्टी यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी सेफ्टी/वाहतूक म्हणून कार्यरत होत्या.

दुबे यांना भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. रेल्वे सेवेदरम्यान त्यांनी रेल्वेच्या लखनौ, इज्जतनगर, वाराणसी, सोनपूर विभागांमध्ये आणि उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय असलेल्या गोरखपूर येथे परिचालन आणि वाणिज्य विभागात विविध पदांवर काम केले आहे.

त्यांनी भारतीय रेल्वेच्या विविध प्रमुख स्टेशन यार्डसच्या गुंतागुंतीचे परीक्षण करण्यात योगदान देऊन अनेक जटिल परिचालन आणि सेफ्टी समस्यांवर व्यावहारिक उपाय प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्याकडे भारतीय रेल्वेच्या परिचालनात सेफ्टीच्या क्रियाकलापांमध्ये (Pune News) काम करण्याचा मोठा अनुभव आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना 2005 मध्ये रेल्वे मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्काराने आणि रेल्वे मंत्र्यांनी 2018 मध्ये रेल्वे सेफ्टी कमिशन मधील उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित केले आहे.

Pimpri News : शालेय पोषण आहारात काचा, प्लास्टिक, अळ्या आढळून देखील संबंधित संस्थेवर कारवाई न करणा-या शिक्षण विभागाच्या उपायुक्तांना निलंबित करा

दुबे यांनी जपान येथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाशी संबंधित कामाचे प्रशिक्षण घेतले आहे. अलीकडेच त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वगुणांसाठी युनायटेड किंगडम ब्रिटन सरकारने चेवेनिंग गुरुकुल फेलोशिप प्रदान करुन गौरव केला आहे.

दुबे यांनी सुरक्षित रेल्वे संचालन, प्रवाशांच्या सुविधा, गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारणे, रेल्वे प्रकल्प पूर्ण करणे आणि पुणे विभागातील रेल्वेचे उत्पन्न वाढवणे या गोष्टी त्यांच्या प्राधान्यक्रमात ठेवल्या आहेत. प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू जेणेकरून माननीय पंतप्रधानांचे देशाला अधिक गतिशील बनवण्याचे विजन पूर्ण केले जाऊ शकेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.