Sankalp Yojana : उद्योगांना संकल्प योजनेतून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल : अरिंदम लाहिरी

एमपीसी न्यूज : सध्या देशातील उद्याेगांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असणार्‍या चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘संकल्प’ योजनेच्या (Sankalp Yojana) ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ प्रकल्पाद्वारे जर्मन निष्णात तज्ज्ञांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणारे प्रशिक्षक पुढील काळात उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी प्रयत्न करून उद्योगांची गरज पूर्ण करतील असा विश्वास एएसडिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी यांनी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालया तर्फे ‘संकल्प’ या योजनेअंतर्गत 200 प्रशिक्षणार्थीचा ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स’ हा कार्यक्रम चिंचवड येथील पुणे इंजिनीरिंग क्लस्टर येथे सुरु असून या मोफत कार्यक्रमातील तिसऱ्या बॅचचे उद्धघाटन श्री विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि.17) करण्यात आले.

यावेळी टाटा मोटर्सचे डिजिटल इनिशिएटिव्ह अँड स्पेशल प्रोजेक्ट विभागाचे सर्वना कुमार, इन्स्टिटयूट ऑफ क्वालिटी अँड रिलायबिलिटी इंडियाचे संचालक हेमंत उर्ध्वरेषे, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष सतीश काळोखे, जीआयझेडचे अमर पाटील, इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे, किरण नवाथे, कॅलिस्टस मोझेस, गणेश दिवेकर आदी उपस्थित होते. तर, एएसडिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी हे ऑनलाइन सहभागी झाले होते.

यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष सतीश काळोखे म्हणाले की, “भारतीय उत्पादनांची गुणवत्ता चांगली असली तरी ग्राहकांचा द्दष्टिकोन बदलण्याची आहे. उत्पादन करतानाही आपणही चांगला द्दष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक उत्पादन मी अधिकाधिक चांगले कसे करू शकतो, हा द्दष्टीकोन प्रशिक्षणार्थांनी ठेवला पाहिजे.”

यावेळी टाटा मोटर्सचे डिजिटल इनिशिएटिव्ह अँड स्पेशल प्रोजेक्ट विभागाचे सर्वना कुमार म्हणाले की,”देशाच्या एकूण सकल उत्पन्नात ऑटोमोबाइल उद्योगाचा वाटा मोठा आहे. या क्षेत्रात निष्णात मनुष्यबळाची गरज आहे. जर हे वेळेत उपलब्ध झाले तर उद्योग, व्यवसाय सक्षम होतील आणि त्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नात वाढ होऊन देशाच्या विकासासाठी उपयोग होईल. त्यासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हा कार्यक्रम उपयुक्त आहे.”

तज्ञ प्रशिक्षक रामकृष्ण बोराडे व (सीएनसी) बॅचचे प्रशिक्षणार्थी संतोष काटकर, जगदिश नागरगोजे, गणेश मोहोळ, कृष्णा पाटील आधुनिक वेल्डिंग बॅचचे तज्ञ प्रशिक्षक विजय गोरडे प्रशिक्षणार्थी जी. एम. घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. या अकरा आठवड्याच्या प्रशिक्षणातील सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्स, ऍडव्हान्स वेल्डिंग टेकनॉलॉजि, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर हे कोर्स सध्या सुरु आहेत. सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्सची पहिली एक बॅच यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून ऍडव्हान्स वेल्डिंग टेकनॉलॉजि या बॅचचे इंडस्ट्रीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग सुरु आहे. टाटा मोटर्स सारख्या नामवंत कंपनीमधील निवृत्त प्रशिक्षकांकडून थेअरी, प्रात्यक्षिकासहित एक महिन्याचे प्रशिक्षण, एक महिना इंडस्ट्रीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, जर्मन एक्सपर्ट एक आठवडा प्रशिक्षण, एक आठवडा इंडस्ट्री एक्स्पर्टचे प्रशिक्षण असे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आयटीआय, इंजिनीअरिंग कॉलेज येथील प्रशिक्षक, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रामधील वर्किंग प्रोफेशनल, लघुउद्योजक, निवृत्त अथवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत.

सूत्रसंचालन कॅलिक्टस मोझेस, आभार इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी मानले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रशिक्षणार्थींना चांगला फायदा झाला असून सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्सची दुसरी बॅच 24 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून पशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना 10,000/- (दहा हजार) रुपये विद्या वेतन आहे. तसेच, पुण्याबाहेरील प्रशिक्षणार्थींची मोफत भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ‘ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिल’ आणि ‘इंडो जर्मन चेम्बर ऑफ कॉमर्स’ अशी दोन प्रमाणपत्र दिली जातात. प्रशिक्षण (Sankalp Yojana) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि सुवर्ण संधी असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंजिनीरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे (7507144244) यांनी केले आहे. त्यासाठी खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करावे.

https://forms.gle/vCMULF8yyTLEThYe9

Vishal Moghe : विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती प्रथम पुरस्काराने युवा गायक विशाल मोघे सन्मानित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.