Pimpri : उद्योगांमुळे राष्ट्रनिर्मिती तर सैन्यामुळे राष्ट्र सुरक्षित – राज्यपाल के. टी. पारनाईक

एमपीसी न्यूज – आर्मी आणि उद्योग ही दोन्ही क्षेत्र रोजगार निर्मिती करणारी क्षेत्र आहेत. उद्योगामुळे राष्ट्रनिर्मिती होते, तर आर्मीच्या सैनिकांमुळे देशाची सुरक्षा अबाधित राहते. यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल तथा परम विशिष्ठ सेवा पदक प्राप्त लेफ्टनंट जनरल (नि) के टी पारनाईक यांनी केले.

Alandi : स्वच्छतेची जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाने वागणे गरजेचे – कैलास केंद्रे

वाकड येथील आयआयईबीएम संस्थेच्या इंडस बिझिनेस स्कूलला बुधवारी (दि. 7) राज्यपाल पारनाईक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कर्नल (नि) विनोद मारवाह, कर्नल (नि) मिर अहमद शाह, कर्नल (नि) रवींद्र कुमार, डॉ. जयसिंग मारवाह, अनघा पारनाईक, अरुणा मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ. विशाल भोळे, प्राचार्य नम्रता जियानी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान राज्यपालांनी इंडस बिजनेस स्कूलच्या इमारतीची, हॉस्टेल आणि वाहन संग्रहालयाची पाहणी केली. राज्यपाल परनाईक म्हणाले की, “सैन्य दलात काम करताना सर्वप्रथम देशाचा विचार करावा लागतो. देशाला चांगल्या संशोधकांची आवश्यकता आहे. भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात होता. आता देशाची ओळख तांत्रिक देश म्हणून होत आहे. मागणी तशी पुरवठा असे व्यवसायाचे सूत्र होते. मात्र आता आजच्या जमान्यात पुरवठा असेल तर मागणी असे चित्र दिसून येत आहे.”

ई-कॉमर्समुळे व्यवसायाचे स्वरूप कसे बदलत आहे व चौकटीच्या बाहेर विचार करणे कसे महत्वाचे आहे, याबाबत देखील राज्यपाल पारनाईक यांनी माहिती दिली. नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर भर देत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.