Pune : केवळ उद्योजक म्हणून नाही तर देशासाठी एक कर्तव्य म्हणून उद्योग करावा – डॉ. मोहन भागवत

एमपीसी न्यूज – आपण उद्योगाचे मालक नसून केवळ विश्वस्त आहोत असा विचार मनात ठेवून काम करावे. भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला पाहिजे या तत्वावर आधारित उद्योग असावा. आपण दुसऱ्यांकरिता काम करतो याचे भान असावे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी एमसीसीआयए, पुणे  (Pune) येथे त्यांच्या भाषणात केले.

Alandi : शांतिब्रम्ह ह भ प मारुती बाबा कुरेकर यांचा 93 वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

यावेळी दीपक करंदीकर, अध्यक्ष, एमसीसीआयए यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशांत गिरबने, महासंचालक एमसीसीआयए यांनी चेम्बरची माहिती दिली. सुमारे 300 पेक्षा जास्त प्रेक्षक या प्रसंगी उपस्थित होते.

भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्वज्ञान इतर देशांपेक्षा वेगळे आहे. इतिहासकालीन अर्थव्यवस्थेतील दाखले देत भागवतांनी भरपूर उत्पादन, संयमित उपभोग आणि विकेंद्रित उत्पादनावर भाष्य केले. भारतीय उद्योगाचा पाया हा आपल्याबरोबर समाजाचा फायदा बघण्यावर आहे असंही ते म्हणाले. जसं एखादा शेतकरी स्वतःसाठी अन्नधान्य पिकवत नाही, तर तो समाजासाठी शेती करतो. त्याप्रमाणे उद्योगजगताने सुद्धा व्यापक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करावा. कारण समाजाच्या भरभराटीत च वैयक्तिक भरभराट दडलेली आहे.

उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या अनेक अंगांना स्पर्श करतांना डॉ भागवत यांनी औद्योगिकरण, शाश्वत ऊर्जेचा वापर, आणि उद्योगात मानवीय दृष्टिकोन ठेवण्याचा आग्रह केला. संपत्ती हि केवळ पैशात न मोजता बुद्धीची संपत्ती ही तितकीच महावत्वाची आहे हा भारतीय संस्कृतीतील विचार आपण विसरता काम नये असं ते म्हणाले. संपत्तीचा विनियोग कसा करावा ह्याबद्दल बोलताना त्यांनी सहा भागांमध्ये ती कशी सारख्या प्रमाणात वापरावी ह्याबद्दल माहिती दिली. त्यामध्ये स्वतःच्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यांसाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि निकडीच्या प्रसंगांसाठी संपत्तीचे सामान भाग करावेत असे ते म्हणाले.

या सत्रात अर्थव्यवस्थेवरील प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. मोहन भागवत यांनी दिली. येत्या 20ते 30 वर्षात भारतात लक्षणीय सुधारणा होईल, आणि त्यासाठी आपण आपले कर्म सात्यत्याने करत राहावे असा ही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रशांत गिरबने, महासंचालक एमसीसीआयए यांनी आभारप्रदर्शनाचे भाषण केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.