Influenza H3N2 : शहरात पहिला बळी, भोसरीतील वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – H3N2 व्हायरसने पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला (Influenza H3N2 ) बळी गेला आहे. भोसरीतील एका 73 वर्षीय पुरुष रुग्णाचा या आजारामुळे आज (गुरुवारी) सकाळी मृत्यू झाला आहे.

जीवघेण्या H3N2 व्हायरसने देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भोसरीतील एका वृद्धाला या व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.