Hinjwadi : ‘इन्फोसिस’च्या प्रकल्प व्यवस्थापकाची फेक अकाऊंटद्वारे बदनामी

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाच्या फेसबुक आणि लिंकइन या वेबसाईटवरील माहिती आणि फोटोद्वारे फेक अकाऊंट तयार करून बदनामीकारक मॅसेज व्हायरल केले. तसेच इन्फोसिस कंपनीचीही बदनामी केली. हा प्रकार पिंपळे-सौदागर येथे घडला.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमितपालसिंग जोगिंदरसिंग धालीवाल (वय 37, रा. गणेशम फेज 1, पिंपळे-सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे.  त्यानुसार माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धालीवाल हे इन्फोसिस कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. 4 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास ‘क्युरा डॉट कॉम’  या वेबसाईटवर सुमितपालसिंग धालीवाल या नावाने धालीवाल यांच्या फेसबुक आणि लिंकइन या वेबसाईटवरील माहिती आणि फोटोद्वारे अनोळखी व्यक्तीने फेक अकाऊंट ओपन केले. त्यावर धालीवाल यांच्या नावाने बदनामीकारक मॅसेज पोस्ट केले. तसेच धालीवाल यांच्यासह इन्फोसिस कंपनीची बदनामी केली.हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.