Infotainment News : Whatsapp चे नवीन स्टिकर सर्च फीचर  

एमपीसी न्यूज : Whatsapp वर आता काही नवीन फीचर्स आहेत येणार आहेत. WABetaInfo च्या एक रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉयड अॅपसाठी नवीन एनिनमेटेड स्टिकर पॅक जारी करणार आहे. नवीन स्टिकर सर्च फीचर या स्टिकर पॅकचे नाव Baby Shark आहे. याची साईज ३.४ एमबी इतकी असणार आहे.

नवीन स्टिकर पॅक शिवाय लवकरच हे अॅप स्टिकर सर्च फीचर येणार आहेत. या फीचर द्वारे व्हॉट्सअॅप युजर्सला अॅप मध्ये स्टिकर सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. जीफ फाइल्स सर्च करतेय त्याप्रमाणे ही सुविधा असणार आहे.रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने काही निवडक युजर्ससाठी हे फीचर जारी केले आहेत. ज्यांना हे फीचर मिळणार आहे. त्यांना अॅपच्या स्टीकर पर्यायात नवीन सर्च आयकॉन दिसतील. हळू हळू हे फीचर सर्व युजर्स पर्यंत पोहोचणार आहे.

नवीन इन अॅप सपोर्ट

याशिवाय व्हॉट्सअॅप मध्ये नवीन इन अॅप सपोर्ट फीचर येत आहे. याद्वारे युजर्सना काही समस्या येत असल्यास या अॅपच्या अधिकृत सपोर्ट टीम सोबत व्हॉट्सअॅप चॅट द्वारे कम्यूनिकेट करू शकतील. WhatsApp Support Chat एक अधिकृत चॅट असणार आहे. तसेच दुसऱ्या चॅट्सप्रमाणे यात अँड टू अँड इनस्क्रिप्शनची सुविधा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.