Infra Dot Market : इन्फ्रा डॉट मार्केटच्या नवीन प्लायवूडचे लॉन्चिंग

एमपीसी न्यूज : इन्फ्रा डॉट मार्केटच्या (Infra Dot Market) वतीने नवीन प्लायवूडचे लॉन्चिंग वाकड येथे करण्यात आले आहे. वाकडमधील हॉटेल ॲम्बिअन्स एक्सलन्सी येथे एका शानदार समारंभात हे लॉन्चिंग झाले. 

त्यावेळी विश्वकर्मा संस्थेचे मुख्य व नामवंत राजस्थानी सुतार मोहनलाल सुतार, युवानेते शुभम चंद्रकांत नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात इन्फ्रा डॉट मार्केटचे प्लायवूड (Infra Dot Market) विभाग प्रमुख योगेश्वर पाटील, पुणे शाखेचे व्यवस्थापक प्रसाद जगताप, झोनल मार्केटिंग हेड संजीत झा, रिजनल हेड उपेंद्र चौबे, असिस्टंट मॅनेजर शैलेश श्रीवास्तव आणि महेश घुटुकडे हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

 

Pune : पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त तब्बल 4440 ठिकाणी पार पडले रक्तदान शिबिर

डिलर म्हणून पिंपरी-चिंचवड येथील श्री नागणेची प्लायवूडचे सुमेर राठोड आणि आझाद राठोड , अदिती एंटरप्राइजेस (अशोक एंटरप्राइजेसचे ) अशोक विश्वकर्मा आणि पोकार ट्रेडर्सचे कल्पेश पोकार यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. (Infra Dot Market) त्यानंतर इन्फ्रा मार्केटचे नवीन प्लायवूड टिंबा, मरीनाक्वाड्रो, केलिब्रम सिरीस या नवीन प्लायवूडचे सुतार व्यावसायिक आणि चिनी बांधवांसमोर सादरीकरण करण्यात आले.

यानंतर सर्व उपस्थित कुशल सुतार कारागिरांना नव्या प्लायवूडबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुतारांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना भेट म्हणून किट वाटप करण्यात आले. ‘प्लाय में है दम’ अशी इन्फ्रा डॉट मार्केटची टॅग लाईन आहे.

टिंबा प्लायवूड हे फर्निचरसाठी वापरले जाणारे आहे. केलिब्रम हे किचन दरवाज्यांसाठीचे 16 mm जाडीचे प्लायवूड आहे.  मरीनाक्वाड्रो हे प्रीमियम प्रॉडक्ट आहे. (Infra Dot Market) मॅट फिनिश असणारे हे प्लायवूड व्यावसायिक गरजांसाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. इन्फ्रा डॉट मार्केटकडे इन हाऊस लॅब आहे म्हणून त्यांचे उत्पादन आणि त्याचे परीक्षण हे लवकर केले जाते. सगळेच प्लायवूड हे उत्तम दर्जाचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.