Infra Market : इन्फ्रा मार्केट’च्या मार्केटिंग टीमतर्फे नवीन प्लायवूडचे लाँचिंग

एमपीसी न्यूज – इन्फ्रा मार्केटच्या मार्केटिंग (Infra Market) टीमतर्फे त्यांचा नवीन प्लायवूडचे लाँचिंग पुणे येथील स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथे करण्यात आले. 

पुण्यामधील हॉटेल उत्सव डिलक्स येथे हे लॉन्चिंग झाले. रावत ब्रदर्स फर्निचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ प्रमोद रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इन्फ्रा मार्केटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेखर सती यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला इन्फ्रा मार्केटचे प्लायवूड डिव्हिजन प्रमुख योगेश्वर पाटील, पुणे शाखेचे व्यवस्थापक प्रसाद जगताप, झोनल मार्केटिंग हेड संजीत झा, रीजनल हेड उपेंद्र चौबे, एरिया सेल्स मॅनेजर महेश घुटुकडे आणि शैलेश श्रीवास्तव आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे डेप्युटी मॅनेजर धनंजय इंदुलकर व संतोष कोडके आदी हजर होते.

डीलर्स म्हणून पुण्यामधील शार्प डिस्ट्रिब्युटर्सचे विजय कोठारी, मीनाक्षी प्लायवूडचे विजय ओसवाल, मंचर येथील  पोकार ट्रेडर्सचे भरत पोकार हे उपस्थित होते.

Chikhali : विश्व श्री राम सेना आयोजित श्री राम जन्मोत्सवाची जल्लोषात सांगता

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.(Infra Market) त्यानंतर इन्फ्रा मार्केटचे नवीन प्लायवूड टिंबा, मरीनाक्वाड्रो, केलिब्रम सिरीस यांचे सुतार बांधवांसमोर सादरीकरण करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित कुशल सुताराना नव्या प्लायवूड बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सुतार व्यावसायिकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना भेट म्हणून किट वाटप करण्यात आले. ‘प्लाय में है दम’ अशी टॅग लाईन ही इन्फ्रा मार्केटने वापरून सर्व ग्राहकांसमोर सादर केली आहे.

टिंबा प्लायवूड हे फर्निचर साठी वापरले जाणारे आहे. केलिब्रम हे किचन दरवाजासाठी 16 mm जाडीचे प्लायवूड आहे.  मरीनाक्वाड्रो हा प्रीमियम प्रॉडक्ट आहे. (Infra Market) मॅट फिनिश असणारे हे प्लायवूड व्यावसायिक गरजांसाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. इन्फ्रा मार्केटकडे इन हाऊस लॅब आहे म्हणून त्यांचे उत्पादन आणि त्याचे परीक्षण हे लवकर केले जाते. सगळेच प्लायवूड हे उत्तम दर्जाचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.