Talegaon Dabhade: केदार भेगडेंकडून थर्मल स्क्रिनिंगसाठी इन्फ्रारेड थर्मामीटरची सोय

Infrared thermometer facility for thermal screening for talegaon dabhade's citizens from Kedar Bhegade

एमपीसी न्यूज- देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या सुचनेनुसार सुरक्षेसाठी मावळमधील प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्क्रिनिंग चाचणी तळेगाव दाभाडे येथे सुरू करण्यात आली आहे.

ही थर्मल स्क्रिनिंग टेस्ट अधिक जलद गतीने व्हावी यासाठी केदार भेगडे यांच्या वतीने 5 इन्फ्रारेड थर्मामीटर (टेंप्रचर गन) माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहरासाठी भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र माने, बाळासाहेब घोटकुले, समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.