Piyush Goyal : नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

एमपीसी न्यूज : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंग विभागाच्या वतीने दीक्षाआरंभ सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.(Piyush Goyal) या कार्यक्रमाला 5500 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. डीपीयूने आपल्या नवीन बॅचचे स्वागत करण्यासाठी आणि अभ्यासक्रम तसेच शिक्षक सदस्यांच्या परिचयासह माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी दीक्षाआरंभचे आयोजन केले होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व त्यानंतर सरस्वती वंदनेने झाली.

ज्ञानाच्या शोधात उतरल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल म्हणाले, “ऑनलाइन एमबीए आणि बीबीए हा डीपीयूने सुरू केलेला एक अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. ऑनलाइन शिक्षणाचे मूल्य विशेषतः कोविड काळात. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ केवळ शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेली संस्था आहे. (Piyush Goyal) या संस्थेतील कुशल प्राध्यापकांकडून योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्याने येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनतील. त्यांनी पुढे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानव संसाधन विकासातील महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021, न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम, STEM इकोसिस्टम आणि व्यावसायिक शिक्षणावर चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Dilip Sonigara : दिलीप सोनिगरा यांची दिवाळी निमीत्त बंपर ऑफर

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि कार्यकारी संचालक स्मिता जाधव, तसेच डॉ. सफिया फारुकी, संचालक – ऑनलाइन लर्निंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कुलपती – डॉ. पी. डी. पाटील – “आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि देशातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना केली. (Piyush Goyal) इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा विश्वास आहे की योग्य शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये परिपक्वता, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान यांसारखे गुण वाढवू शकते. सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंगमधील ऑनलाइन एमबीए आणि बीबीए प्रोग्रामबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “कोर्सचा सर्वात चांगला भाग म्हणजे शिक्षण घेणारे जगभरातून कोठूनही त्यांच्या स्वत:च्या वेळेप्रमाणे आणि वेगाने अभ्यास करू शकतात. येथे कॅम्पसमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्यासाठी, नवनवीन शोध घेण्यासाठी आणि क्षमता विकसित करण्यासाठी दर्जेदार शिक्षण प्रदान करण्याची खात्री देतो.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.