Bhosari : सिलिंडरच्या स्फोटातील जखमी शिक्षक महिलेचा मृत्यू  

एमपीसी न्यूज – भोसरी, संत तुकारामनगरमधील सिलिंडरच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शिक्षक महिलेल्या शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनीषा ज्ञानेश्वर साळुंके (वय 35, रा. भोसरी), असे मृत्यू झालेल्या शिक्षक महिलेचे नाव आहे.

भोसरी, संत तुकारामनरमधील गुरुकृपा कॉलनीत बुधवारी (दि.4) सिलिंडरच्या गॅसगळतीमुळे स्फोट झाला होता. या स्फोटात मनीषा या 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे त्यांना नळीद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात येत होता. मात्र, त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने शनिवारी रात्री साडेदहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक मुलगा आहे. श्रमजीवी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून त्या कार्यरत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like