_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri News : समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्यावर अन्याय; महासभेत ठराव होऊनही  पदोन्नती मिळेना

गोरगरिबांना आर्थिक लाभ मिळवून ऐवले पदोन्नतीच्या 'लाभा' पासून वंचित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे विविध योजनाचा गोरगरिबांना आर्थिक लाभ मिळवून देणारे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले हे मात्र पदोन्नतीच्या ‘लाभा’ पासून वंचित राहिले आहेत. पाच वर्षांपूर्वी महासभेत पदोन्नतीचा ठराव होऊनही ऐवले यांना पदोन्नती दिली जात नाही. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय प्रलंबित ठेवला. आता विद्यमान आयुक्त राजेश पाटील यांच्याकडूनही पदोन्नतीचे आश्वासन दिले जात आहे. ऐवले या महिनाअखेर सेवानिवृत्त होत असून त्यांना पदोन्नती कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची पदोन्नती गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली आहे. नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे शंभरहून अधिक योजना राबविल्या जातात. त्या योजनांची इत्यंभूत माहिती ठेवणे आणि अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे काम ऐवले यांना हाताळावे लागते.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील हजारो गोरगरीब नागरिकांना करोडो रुपयांचा लाभ त्यांनी मिळवून दिला आहे. त्यामुळे सर्वच योजनांच्या लाभार्थ्यांनी देखील त्यांच्या पदोन्नतीसंदर्भात आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या पदोन्नतीचे तीन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. ठराव क्रमांक 913, 499, 578 यातील कोणत्याही एका पदावर पदोन्नती देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सभेने तीन ठरावाला मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये सहायक आयुक्त (सामुहिक विकास), सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) आणि मुख्य समाज विकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. यापैकी एका पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी ऐवले यांनी केली आहे. मात्र, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शेवटपर्यंत त्यांना झुलवत ठेवले. हर्डीकरांच्या हातात असताना त्यांनी ऐवले यांना पदोन्नती दिली नाही. आता नवीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून ऐवले यांना न्याय मिळेल, अशी आपेक्षा आहे. ऐवले 31 मे 2021 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्याबाबत आजपर्यंत एकही तक्रार नसताना देखील त्यांना पदोन्नती का दिली जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.