PimpleSaudagar : येथील पाण्याच्या टाकीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील राराजमाता जिजाऊ उद्यानांतील नियोजित २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्या मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

पिंपळे सौदागर परिसराचा मोठा झपाट्याने विकास झाला आहे. सर्वत्र टोलेजंग इमारती पहायला मिळतात, परंतु ज्या पटीने विकास वाढत आहे. त्याच पटीन नागरी सुविधांवर देखील ताण पडतो आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसराला मुबलक पाणी मिळावे यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांच्या नवीन पाण्याच्या टाकीसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार राजमाता जिजाऊ उद्यानांत २० दशलक्ष लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येणार असून त्यांचे भूमिपूजन उद्या दि.२२ जानेवारीला सकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे, असे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.