Pune : इनर व्हील आणि झूम कारच्या वतीने 200 विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

एमपीसी न्यूज – इनर व्हील डिस्ट्रिक्ट 313 आणि झूम कार यांच्या संयुक्त विद्यमाने 200 होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप केले. त्यामुळे या विद्यार्थिनींच्या पाठीवरचे ओझे हलके झाले आहे. हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पुणे येथील महावीर जैन विद्यालयात शनिवारी (दि. 26) पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इनर व्हील असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा स्मिता पिंगळे उपस्थित होत्या. डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्षा रेणू गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अहमदनगर, अकलूज, औरंगाबाद, भोर, जालना, खोपोली, लोणंद, मंचर, पुणे, पंढरपूर, सोलापूर, तळेगाव आदी शहरातील इनर व्हीलच्या 28 क्लबचा यामध्ये सहभाग होता. या क्लबच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थिनींना या सायकल देण्यात आल्या.

मोबाईलवरील एका बटनाद्वारे कार आणि टॅक्सी जागेवर येते. या आधुनिक काळातही काही प्रमाणात गरीब वर्ग आहे, त्यांना प्रवासाच्या या सगळ्या गोष्टी परवडणा-या नसल्याने ते पायी जाण्याचा पर्याय निवडतात. अशावेळी प्रवासासाठी सायकल देखील त्यांच्यासाठी खूप मोठं साधन असतं. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींची मोठी फरफट होते. त्यामुळे गरजू आणि होतकरू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रांमध्ये इनर व्हील क्लब काम करत असल्याची माहिती रेणू गुप्ता यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.