रविवार, जानेवारी 29, 2023

Innerwheel Club : रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Innerwheel Club), रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व वरसा कंट्रोल मेजरमेंट टेक्नॉलॉजी लीमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. वरसा कंट्रोलच्या आवारात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले.

या वेळी अतुल पवार, रोटरी क्लबचे यादव खळदे, विलास जाधव, मंगेश गारोळे, शंकर जाधव, आनंद असवले, धनंजय मथुरे, भालचंद्र लेले, विकास उभे, प्रमोद दाभाडे, मयुरा होले, दिपा कुलकर्णी, रश्मी असवले, इनर व्हील क्लबच्या सचिव निशा पवार, सुलभ मथुरे, माया भेगडे, मुग्धा जोर्वेकर, प्रवीण साठे, संगीता जाधव, डॉ लीना कवितके, ज्योती जाधव, आर्या चितळे व इतर सदस्य उपस्थित होते.

Supriya Shinde : उद्योगातून स्वतःची ओळख निर्माण करा – सुप्रिया शिंदे

यामध्ये रो संजय अडसूळ यांनी 54 वेळेस रक्तदान केले. प्रकल्प प्रमुख वरसा कंट्रोल च्या अर्चना उद्धव चितळे, त्यांचा कर्मचारी वर्ग व पिंपरी सेरॉलॉजीकल ब्लड सेन्टर यांनी सर्व नियोजन पाहिले.

या वेळी इनरव्हील अध्यक्षा वैशाली दाभाडे, रोटरी अध्यक्ष अनिश होले, उपाध्यक्ष व वरसाचे सर्वोसर्वा उद्धव चितळे यांनी रक्तदान करण्यासाठी आव्हान केले होते.

Latest news
Related news