Pune : अभिनव, दस्तूर प्रशाला विजेते 

सृजन करंडक 2019 आंतरशालेय बास्केटबॉल 

एमपीसी न्यूज – अभिवन विद्यालय संघाने मुलांच्या, तर दस्तूर होर्मारझदिआर प्रशाला संघाने मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले. दस्तूर प्रशाला संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने अभिनव विद्यालयाचे दुहेरी मुकुट पटकाविण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. डेक्कन जिमखाना क्‍लबच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात अभिनव विद्यालय संघाने चुरशीच्या लढती मिलेनियम प्रशालेचे आव्हान 46-40 असे परतवून लावले. मध्यंतराला मिळविलेल्या 30-18 या मोठ्या आघाडीचा त्यांना फायदा उठविता आला नाही.

पूर्वार्धात मागे राहिल्यावर मिलेनियमच्या मुलांनी उत्तरार्धात सामन्यातील तिसऱ्या सत्रात जोरदार खेळ केला. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात त्यांनी आपला खेळ अधिक उंचावून अभिनवचे गुण गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यंतराला पत्करावी लागलेली मोठी पिछाडीच त्यांच्या पराभवाचे कारण ठरली. अभिवनकडून आदी जगदाळे याने 17, अभिषेक माळी याने 11 गुणांची नोंद केली. मिलेनियमच्या अश्‍विन हुलावळे याने 13 गुण मिळविले.
त्यापूर्वी झालेल्या मुलींच्या अंतिम लढतीत दस्तूर प्रशाला संघाने अभिनवचे आव्हान 46-28 असे सहज संपुष्टात आणले. सामन्यातील चारही सत्रात त्यांच्या तन्वी साळवे हिने केलेली कामगिरी लक्षवेधक आणि निर्णायक ठरली. तिने 18 गुणांची कमाई केली. मध्यंतरालाच त्यांनी 23-10 अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निर्णय जवळपास निश्‍चित केला होता. अभिनवकडून सानवी घोलप हिने 14 गुण नोंदवून एकाकी लढत दिली.

निकाल –
मुले (अंतिम सामना) – अभिनव विद्यालय 46 (आदी जगदाळे 17, अभिषेक माळी 11) वि.वि. मिलेनियम स्कूल 40 (अश्‍विन हुळावले 13) मध्यंतर 30-18

तिसरा क्रमांक – डी. ए. व्ही. स्कूल 43 (कुणाल भोसले 18, शार्दुल पाठक 13) वि.वि. विद्या भवन प्रशाला 35 (शिवराज पटेल 24) मध्यंतर 25-24

मुली (अंतिम सामना) – दस्तूर होर्माझदिआर प्रशाला 46 (तन्वी साळवे 18, भूमिका सर्जे 18) वि.वि. अभिनव विद्यालय 28 (सानवी घोलप 14) मध्यंतर 23-10

तिसरा क्रमांक – सेंट जोसेफ प्रशाला 36 (सिया खिलारे 16) वि.वि. एसपीएम स्कूल 25 (अस्मी व्होरा 10) मध्यंतर 18-11

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.