Innovative Comparison Of Wafers: या ‘पाकिटा’त दडलंय काय ?

Innovative Comparison Of Wafers तीनही ब्रँडची दहा रुपयांची पाकिटे त्यांनी एका डिशमध्ये रिकामी केली. आणि सत्य लगेचच त्यांच्या समोर आले.

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये घरी तयार केलेल्या पदार्थांची चलती होती. बाहेर कुठेही रेस्तराँ, हॉटेल, फूड जॉइंट सुरुच नव्हते. शिवाय सगळेच घरी होते. त्यामुळे दररोज वेगवेगळी फर्माईश होत होती आणि ती पूर्ण पण केली जात होती. या काळात बच्चे कंपनीने खूप मिस केले ते कुरकुरीत, खमंग अशा वेफर्स, कुरकुरे, चीज बॉल्स यांना. आता दुकानांमध्ये या सगळ्या गोष्टी पुन्हा मिळू लागल्या आहेत.

पण या दरम्यान एका सद्गृहस्थांनी एक वेगळाच प्रयोग करुन बघितला. एक वेगळा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला हे समजून गंमत वाटेल की आपण ज्यावर सर्वात जास्त भरवसा ठेवून असतो, तेच आपल्याला दगा देतात अशा निष्कर्षावर ते आले. म्हणजे मराठीत एक म्हण आहे त्यानुसार आपल्याला अनुभव येतो. ती म्हण म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा…

सहजच म्हणून त्या व्यक्तीने लहानथोरांचे सर्वांचे आवडते असे खाद्य म्हणजे लेज, बिंगो आणि हलदीराम यांच्या वेफर्सच्या पॅकेटचा अभ्यास केला. त्यांनी या तीनही ब्रँडच्या पाकिटात साधारणपणे किती वेफर्स असतात हे शोधले.


या तीनही ब्रँडची दहा रुपयांची पाकिटे त्यांनी एका डिशमध्ये रिकामी केली. आणि सत्य लगेचच त्यांच्या समोर आले. या अभ्यासात नापास झाले ते लेज आणि विजेते ठरले ते हल्दीराम. लेजच्या पाकिटात अगदी दहा-बाराच वेफर्स आढळले. तर त्यापेक्षा थोडे जास्त वेफर्स बिंगोमध्ये होते. मात्र हल्दीरामच्या पाकिटात या दोन्हीपेक्षा जास्त वेफर्स होते. त्यामुळे या अभ्यासात हल्दीरामच सरस ठरले.

आता यावर कोणी असे देखील म्हणेल की हा ब्रँडचा फरक आहे. तर त्याचे उत्तर हो असे असेल. पण आपण नक्कीच याचा डोळसपणे विचार करायला हवा की आपला पैसा आपण योग्यरित्या खर्च करतो की नाही. म्हणजे आपल्या पैशांचे योग्य मूल्य आपल्याला कोण देते याचा ग्राहकांनीच विचार करायला हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.