-MPC-TOP-MOST-BANNER-I

Innovative messege by Zee Yuva: कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी अभिनव संदेशांचे प्रसारण

हे कलाकार प्रेक्षकांना गणेशोत्सवामध्ये गर्दी टाळण्याच्या, बाहेर न पडण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करताना दिसतात.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सुखकर्ता दुखहर्ता गणरायाचे आगमन सध्या घराघरात झाले आहे. रविवारी दीड दिवसांच्या गणरायांना आपण साश्रु नयनांनी निरोप देखील दिला. पण यंदा या उत्साहावर कोरोनाचे गडद सावट आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काही नियम आखले आहेत. अशातच झी युवा वाहिनीवरील मालिकांमधून एक सामाजिक संदेश दिला जात आहे.

शासनातर्फे या वर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय आणि साध्या पद्धतीने, करोना संदर्भातल्या सर्व खबरदारी पाळत साजरा करण्याचा आदेश जाहीर केला गेलाय. यात आता झी युवा वाहिनीतर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या कार्यक्रमांमधून या संदर्भातले संदेश देण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

झी युवा वाहिनीचे कलाकार त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे महत्व सांगताना दिसत आहेत. ‘डॉक्टर डॉन’, ‘प्रेम पॉयजन पंगा’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ अशा लोकप्रिय मालिकांमधले हे कलाकार प्रेक्षकांना गणेशोत्सवामध्ये गर्दी टाळण्याच्या, बाहेर न पडण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करताना दिसतात. ‘मी गर्दीत जाणार नाही कोरोनाला घरी आणणार नाही’, हा सामाजिक संदेश झी युवा आणि या कलाकारांतर्फे दिला जातोय.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn