Pimpri News : अदानी उद्योग समूहाची चौकशी करा –   कैलास कदम

एमपीसी न्यूज –  अदानी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीचे (Pimpri News) कायदे पायदळी तुडवून हजारो कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. हे हिडेनबर्ग कंपनीने उघडकीस आणले आहे.

अदानी यांच्या कंपन्यांमध्ये एलआयसी आणि एसबीआयच्या व्यवस्थापनाने हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसी आणि एसबीआय मधील हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा असून या पैशाबाबत केंद्र सरकारने हमी द्यावी. अदानी उद्योग समूहाने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी केंद्र सरकारने समिती नेमून करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केली आहे.

Chinchwad Bye-Election : 14 जणांनी भरले 22 अर्ज तर डॉ. अनिल रॉय यांच्यासह 12 जणांनी घेतले अर्ज

काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कदम यांच्या नेतृत्वाखाली पुणे-मुंबई महामार्गावरील एसबीआयच्या शाखेसमोर आणि आकुर्डी प्राधिकरणातील एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

मानव कांबळे, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर ॲन्थोनी, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायणन, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिक्षण मंडळ  माजी सभापती अभिमन्यू दहितुले, डाॅ. मनिषा गरूड, प्रियंका कदम, भारती घाग, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता जाधव,  (Pimpri News) भाऊसाहेब मुगुटमल, निखिल भोईर, मिलिंद फडतरे, प्रा. किरण खाजेकर, रवि नांगरे, भास्कर नारखडे, बाबासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, हरिष डोळस, दिपक भंडारी, आण्णा कसबे, सतीश भोसले, रवि कांबळे, गणेश नांगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.