Nigdi News: निकृष्ट सिमेंट रोडच्या कामाची चौकशी करा, मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण सेक्टर 25 येथे महापालिकेकडून चालू असलेल्या सिमेंटच्या रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. रस्ता निकृष्ट पद्धतीने बनविला जात आहे. त्याची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे उपशहराध्यक्ष बाळा दानवले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात दानवले यांनी म्हटले आहे की, 0 रोड सुस्थितीत असताना काहींच्या आर्थिक फायद्यासाठी घाट घालण्यात आला. या रोडमुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांना नाहक त्रास व आर्थिक झळ बसली आहे. या रोडमुळे गेल्या एक वर्षापासून नागरिकांच्या घरामध्ये वारंवार पाणी घुसत आहे. कोणत्याही प्रकारचे ड्रेनेजच्या बाबतीत किंवा रेन वॉटरच्या बाबतीत नियोजन केलेले दिसत नाही. अजूनही हा रोड पूर्णत्वास गेलेला नसून पावसाळा तोंडावर आलेला आहे.

या रस्त्याच्या कामांमध्ये निष्काळजीपणा व त्रुटी आढळून येत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी गज बाहेर असून नागरिकांना दुखापत होऊ शकते. रस्त्याच्या कामामध्ये स्टीलचे प्रमाण कमी प्रमाणात वापरले असल्याचे दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये रस्ता खचल्यासारखा वाटत आहे. रस्त्याच्या कडेच्या फूटपाथ वर निकृष्ट दर्जाचे गट्टू बसवलेले आहेत. रस्ता करताना निकृष्ठ काम केलेले आढळून आले आहे. रस्ता निकृष्ट पद्धतीने बनवलेला आहे. या रस्त्याच्या कामाची व ठेकेदाराची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कार्यवाही करावी. राहिलेला रोड लवकरात लवकर करावा अन्यथा मनसे तर्फे आंदोलन केले जाईल अशा इशारा निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.