INS Shivaji : आयएनएस शिवाजी येथे रन फॉर फ्रीडमचे आयोजन

एमपीसी न्यूज : ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने 6 ऑगस्ट रोजी ‘INS शिवाजी लोणावळा’ (INS Shivaji) येथे मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर फ्रीडम’चे आयोजन करण्यात आले होते.

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येक भारतीयाने सामील व्हावे – किशोर आवारे

वयोवर्ष 5 ते 8० वयोगटातील महिला आणि मुलांसह इव्हेंटमधील 7 श्रेणींमध्ये 500 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाला जबरदस्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात लोणावळा महानगरपालिका, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संरक्षण नागरिक आणि धावपटूंचाही मोठा सहभाग होता. लोणावळ्याच्या देशभक्तीच्या उत्साहाने आणि आनंददायी वातावरणाने लोणावळ्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण (INS Shivaji) पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.