Pune : टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – पालकमंत्री चंद्रकांत यांनी गुरुवारी (दि.25) शहरातील भवानी पेठ परिसरातील (Pune) टिंबर मार्केटला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त दुकाने व घरांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून दुर्घटनेची माहिती घेतली.

Khed : वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेच्या 13 व्या वर्धापन दिन साजरा

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाते-किसवे, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के, पुणे मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोटे, पुणे टिंबर मर्चन्ट ॲड सॉ. मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रतन किराड, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मनीषा लडकत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पाटील यांनी आगीच्या दुर्घनेबाबत नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली. या घटनेत टिंबर मार्केटमधील काही दुकानांसोबतच काही घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसनाग्रस्त झालेली तीन घरे लोकसहभागातून उभी करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सदर भागातील आगीची ही तिसरी घटना असून स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करुन दुकाने दुसरीकडे स्थालंतरित करण्याबाबत विचार करण्यात येईल. त्यासोबतच घटनेसंदर्भात लवकरच पुणे मनपा आयुक्तासोबत बैठक लावण्यात येईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजितपवार यांनी ही केली पहाणी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पुण्यातील (Pune)  टिंबर मार्केटला भेट देऊन याप्रकरणाची त्वरीत चौकशी व्हावी अशी मागणी केली असून परिसरातील पार्कींग व्यवस्था, अग्निरोधक यंत्रणेत सुधारणेची गरज असल्याचे ही सांगितले.

Pune : पुण्यातील टिंबर मार्केट मधील जळीत ग्रस्ताना लवकरात लवकर मदतीसाठी प्रशासनाला निर्देश : अजित पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.