Pune: तुळशीबाग बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

Inspection tour of PMC officials to start Tulshibagh market on the ground of coronavirus

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुळशीबागेतील बाजारपेठ सुद्धा सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली.

व्यापारी संघटनेनी दिलेल्या प्रस्तावाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, विभागीय अधिकारी ढोकळे, तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित उपस्थित होते.

सुरक्षिततेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ठराविक दुकाने व पथारी यांना व्यवसाय करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तुळशी बागेत 350 दुकाने आणि 350 स्टॉल आहेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम पळून 50 दुकाने आणि 50 स्टॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी.

तसेच, मंडई परिसरात 7 एकर जागेवर 1600 स्टॉल धारक आहेत. त्यातील 300 स्टॉल सुरू करावे, अशा मागण्या महापालिका अधिकाऱ्यांकडे पाहणी वेळी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती हेमंत रासने यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

याची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना माहिती देण्यात आली आहे. सोमवारी या संदर्भातील निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही रासने यांनी स्पष्ट केले.

एकीकडे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील विस्कळीत जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुळशीबागेच्या 6 एन्ट्री पॉइंटना सुरक्षारक्षक नेमून ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणे, शारीरिक तपमान तपासणी आदी नियोजन करण्यात आले आहे.

एक दुकान आठवड्यातून सुमारे 2 वेळा उघडले जाणार आहे. तुळशीबागेत काम करणारे काही कामगार प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यांची यादी बनवण्याचे काम सुरू आहे. त्यांना सध्या कामावर न येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नितीन पंडित यांनी सांगितले.

यावेळी संजीव फडतरे, मोहन साखरीया, विनायक कदम, राजेश बारणे, अरविंद तांदळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like