Pune : बावधन येथे उद्यापासून तीन दिवसीय बालवैज्ञानिकांचे ‘इन्स्पायर’ प्रदर्शन

एमपीसी न्यूज – केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपुर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सूर्यदत्ता नॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर अवार्ड मानक योजना २०२०’ नववे जिल्हास्तरीय प्रदर्शन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बावधन येथे होत आहे. उद्या दि. २८ ते ३० जानेवारी २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले यांच्या हस्ते होणार आहे.
रोबोटिक्स, ड्रोन, ऑटोमेशन, शेती, आयटी, हवामान बदल आदी विषयांवरील एकूण ६२० विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ६२० बालवैज्ञानिक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रदर्शनामधे सहभागी होणार आहेत.

युवा शास्त्रज्ञ अंकिता नगरकर, जिल्हा परिषद पुणेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे, सुनील कुऱ्हाडे, निरंतर शिक्षण विभागाचे हरून आतार, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, वैज्ञानिक  प्रकल्प घेऊन आलेले बालवैज्ञानिक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक, पुणे पंचक्रोशीतील विज्ञानप्रेमी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, असे पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.