Nano Technology: संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी ‘नॅनो पार्टिकल्स’ विकसित

INST scientists formulate nanoparticle to reduce severity of rheumatoid arthritis नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) शास्त्रज्ञांना यश

एमपीसी न्यूज – मोहाली येथील भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) शास्त्रज्ञांनी चिटोसनसह नॅनो पार्टिकल्स तयार केले आणि संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी या नॅनो पार्टिकल्सला झिंक ग्लुकोनेटसह भारित केले.

हाडांची सामान्य स्थिती कायम राखण्यासाठी झिंक अर्थात जस्ताच्या योग्य प्रमाणाची आवश्यकता असते. संधिवाताच्या रुग्णांमध्ये आणि संधिवात-प्रेरित प्राण्यांमध्ये त्याची पातळी कमी झाल्याची नोंद आहे. झिंक ग्लुकोनेटच्या रूपात जस्ताच्या पूरक मात्रेची जैव उपलब्धता मानवांमध्ये खूप कमी आहे हे देखील तितकेच खरे आहे.

चिटोसन हे क्रॉस्टेसियन्सच्या बाह्य कंकालातून प्राप्त केलेल्या बहुतेक बायोपॉलिमर्सपैकी एक म्हणजे जैव अनुरूप, जैव विघटनशील नैसर्गिक पॉलिसेकेराइड असून शोषण प्रोत्साहन वैशिष्ट्ये दर्शविते. नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या चमूने विशेषतः चिटोसन निवडले आहे कारण ते जैव विघटनशील, जैव अनुरूप, बिन विषारी आणि नैसर्गनिकरीत्या म्यूकोएडेसिव्ह आहे.

_MPC_DIR_MPU_II

यापूर्वी ‘मॅग्नेशियम रिसर्च’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, उंदरांवर याचा प्रयोग केल्यावर झिंक ऑक्साईडच्या प्रमाणित स्वरुपातील सीरम झिंक पातळीत किंचित वाढ झाली, तर नॅनो स्वरूपात सीरम झिंकच्या पातळीत जास्त वाढ झाली परिणामी जस्ताची जैवउपलब्धता वाढली. यामुळे झिंक ग्लुकोनेट नॅनो स्वरूपात विकसित करण्यासाठी नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या चमूला प्रेरणा मिळाली.

या चमूने दोनदा ऊर्ध्वपातित केलेल्या पाण्यात चिटोसन आणि सोडियम ट्रायपॉलीफॉस्फेट वापरुन झिंक ग्लुकोनेट भारित चिटोसनचे नॅनो पर्टिकल्स तयार केले आणि झिंट ग्लुकोनेट एकाचवेळी चिटोसन नॅनो पार्टिकल्सच्या संश्लेषणासह जोडले गेले. या चमूने जैव रासायनिक विश्लेषण, सूक्ष्मदर्शकीय निरीक्षणे आणि सूज आल्यासारखी लक्षणे यासारख्या विविध बाबींचे मूल्यांकन केले आणि झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांद्वारे झिंक ग्लुकोनेटच्या मुक्त स्वरूपाच्या तुलनेत उत्कृष्ट उपचारात्मक प्रभाव शोधण्याचे सुचविले. झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांच्या सूज येण्याच्या गुणधर्मामुळे ते या निष्कर्षाप्रत येऊ शकले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.