Instagram Crime : इनस्टाग्रामवरून महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेचा फोटो वापरून परस्पर इनस्टाग्राम (Instagram Crime) अकाऊंट काढून त्याद्वारे महिलेची बदानामी करणाऱ्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून मोबाईल 8369687022 व satti7shiv या इन्स्टाग्राम अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपींनी संबंधित मोबाईल व इनस्टाग्राम खात्यावरून पिडीतेच्या फोटोचा वापर करून परस्पर नवीन खाते काढले. तसेच, त्या खात्यावरून अश्लिल फोटो व मजकूर टाकून पिडीतेची बदनामी केली. ही माहिती पिडीतेला नातेवाईकांनी दिली.

फिर्यादी सोबतच्या अश्लिल संभाषणाच्या खोट्या पोस्ट तयार करून (Instagram Crime) तयार करून त्या व्हायरल केल्या. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी फोन उचलावे म्हणून इन्स्टाग्रामवरून धमकी देण्यात येत होती. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

South Korea : दक्षिण कोरियात हॅलोविन उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.