Instagram Views: सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग वाढवतं सेलिब्रेटींचं उत्पन्न

Instagram views: Increasing fan following on social media increases celebrity income शहनाज एका पोस्टसाठी सर्वसाधारणपणे पाच लाख रुपये मानधन घेते. मात्र सध्या तिने ही रक्कम वाढवून आता आठ लाख रुपये इतकी केली आहे.

एमपीसी न्यूज- सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग असणं हे नुसतं प्रेस्टीज वाढवणारे नसून त्यामुळे उत्पन्नात सुद्धा भर पडत असते. आता ‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिलचंच पाहा ना. बिग बॉस हा शो संपल्यानंतरही ती सोशल मीडियावर चर्चेत असते. नंतर तिचा एक म्युझिक अल्बमसुद्धा प्रदर्शित झाला. तसेच या रिअॅलिटी शोमुळे तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याच वाढत्या फॉलोअर्समुळे शहनाजला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यासाठी रग्गड पैसा मिळतोय.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर शहनाजचे ४९ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला सात ते आठ लाख लाइक्स असतात तर व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळतात. त्यामुळे शहनाज विविध ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी चांगलं मानधन घेते.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार शहनाज एका पोस्टसाठी सर्वसाधारणपणे पाच लाख रुपये मानधन घेते. मात्र सध्या तिने ही रक्कम वाढवून आता आठ लाख रुपये इतकी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मोठमोठे सेलिब्रिटी एका पोस्टसाठी १० लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात. इतर टीव्ही अभिनेत्रींच्या तुलनेत शहनाज घेत असलेलं मानधन खूपच जास्त आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून कमाई करण्यात ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक असिम रियाजसुद्धा अग्रेसर आहे.

Hopper HQ ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा व क्रिकेटर विराट कोहली हे इन्स्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेतात.

प्रियांका एका पोस्टसाठी सुमारे १ कोटी ८६ लाख ९५ हजार रुपये घेते तर विराट कोहली एका पोस्टसाठी सुमारे १ कोटी ३५ लाख २१ हजार रुपये घेतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.