इन्स्टंट व्हेजीज, कढई, तेल व गॅस तुमचे…. बाकी सगळं आमचं!

एमपीसी न्यूज – वाचून चकित झाला असाल ना ? हे काय आहे नेमकं असा प्रश्न पडला असेल. मंडळी, पोट कुणाला चुकलंय ? प्रत्येकजण पोटासाठी तर धावत असतो. पण धावत असताना आपण आपल्या पोटाकडे दुर्लक्ष करून एकतर वेळेवर जेवत नाही किंवा अबरचबर काहीतरी खाऊन पोट भरतो आणि पुन्हा पोटासाठी धावू लागतो. बऱ्याचदा घरच्या जेवणात सुद्धा रोजच्या त्याच त्याच भाज्या त्याच चवीच्या खायला मिळाल्या की जिभेला देखील खाऊन कंटाळा येतो. चवीमध्ये बदल करण्यासाठी हॉटेलमध्ये जावे तर तिथेही तीच नेहमीच्या चवीची भाजी असते. त्यामुळे काय करावे हा प्रश्न पडतो. इथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते ते म्हणजे इन्स्टंट व्हेजीज !

किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर आज कोणती भाजी बनवायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. एकतर रोजच्या धावपळीची दगदग सांभाळून, भाजी विकत आणा, धुवा, चिरा या प्रकारातून सुटका करण्यासाठी धुवून चिरलेल्या भाज्या प्लॅस्टिकच्या आकर्षक पॅकमध्ये घरोघरी पुरवण्याचा ट्रेंड सध्या चालू आहे. भाजी चिरून मिळाली हो ! पण पुढे तुमच्या त्याच नेहमीच्या मसाल्यामध्ये बनवणार ना ? कुणी कांदा लसूण मसाला वापरेल, कुणी गोडा मसाला वापरेल, कुणी काळे तिखट तर कुणी धने जिरे पावडर. पण बनवण्याची पद्धत तर नेहमीचीच असणार आहे ना ? नेहमीचा मसाला वापरून कसातरी एकदा स्वयंपाक उरकायचा याकडे अनेक गृहिणींचा कल असतो. मग चवीचे खाणाऱ्या पतिराजांची मोठी कुचंबणा होते.

यासाठीच ‘इन्स्टंट व्हेजीज’ने पुढचे पाऊल टाकून गृहिणींची त्यामधून देखील सुटका केली आहे. मात्र हे करत असताना त्यांना आळशी मात्र बनवले नाही. ‘इन्स्टंट व्हेजीज’ने स्वयंपाक करण्याचा आनंद मात्र गृहिणींकडून हिरावून घेतलेला नाही. त्यांनी स्वयंपाक तर करायचा आहे पण थोडासा हटके ! उसमें कुछ नयापन ला कर ! म्हणजेच कढई, तेल व गॅस तुमचे…. बाकी सगळं आमचं ! जाऊ द्या हो, आता नमनाला घडाभर तेल ओतण्यापेक्षा काय आहे ‘इन्स्टंट व्हेजीज’ हे जाणून घेऊ या !

आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. त्यातून गृहिणींचे स्वयंपाकघर कसे बरं दूर राहील ? ‘इन्स्टंट व्हेजीज’ ने सुलभरीत्या हाताळता येणारे एक मोबाइल अँप बनवले आहे. प्ले स्टोर मध्ये जाऊन ते अँप प्रथम डाउनलोड करून घ्या. त्यावर प्रथम आपले रजिस्ट्रेशन करून घ्या. आता तुम्ही आमचे सन्माननीय ग्राहक झाला आहात. या ऍपमध्ये सीझनप्रमाणे उपलब्ध असलेल्या २० ते २५ प्रकारच्या भाज्या आपल्याला दिसतील. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांचे फोटो दिसतील. तुम्हाला आज कोणती भाजी खावीशी वाटतीये त्यावर क्लिक करा. क्लिक केलीत ? …. त्याच्यापुढे चवीवर क्लिक करा. इथेच तर ‘इन्स्टंट व्हेजीज’चे वेगळेपण तुम्हाला दिसेल. एकाच प्रकारची भाजी वेगवेगळ्या चवीमध्ये कशी करायची याचा कानमंत्रच ‘इन्स्टंट व्हेजीज’ आपल्याला देतो.

तुम्हाला भाजीची चव कशी हवी आहे ? तिखट, की थोडीशी गोडसर ? चॉईस इस युवर्स.. ! तुम्हाला हव्या त्या चॉईसवर क्लिक केले की घरातील सदस्यांच्या संख्येवर क्लिक करा. यामध्ये २,३,५ असे ब्लॉक दिसतील. त्यापुढे आपण ऑर्डर केलेल्या भाजीची किंमत दिसेल. पुढे पेमेंटसाठी दिसणाऱ्या ऑप्शनवर (पेटीएम, गूगल पे, नेट बँकिंग कॅश डिलिव्हरी) क्लिक करा. आपला पत्ता, जवळच्या खुणेसह टाईप करा, किती वाजता डिलिव्हरी पाहिजे ती वेळ टाका. तुम्ही दिलेल्या वेळेपूर्वी १५ मिनिटे ‘इन्स्टंट व्हेजीज’चा डिलेव्हरी बॉय बॉक्स घेऊन तुमच्या घरी पोचलेला असेल. हे सर्व माफक दरामध्ये !! आपण आपली ऑर्डर दररोज संध्याकाळी चार वाजेपर्यंत बुक करू शकता. चार वाजेपर्यंत बुक झालेली ऑर्डर संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत घरपोच मिळणार. चार वाजल्यानंतर बुक केलेली ऑर्डर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी केली जाईल.

घरी आलेल्या बॉक्समध्ये विविध पाऊच असतील. त्यावर १,२,३,४, असे क्रमांक असतील. आपण प्रथम गॅस सुरु करून कढईमध्ये थोडे तेल टाकायचे आहे. तेल गरम झाले की गॅस कमी करून वरील क्रमांकाचे पाऊच क्रमाक्रमाने कढईमध्ये टाकून भाजून घ्या. व्यवस्थित भाजून घ्या. कारण मसाला भाजण्यावरच पदार्थांची चव अवलंबून असते. भाजलेल्या मसाल्यामध्ये मुख्य भाजी टाकून व्यवस्थित हलवून घ्यावी. थोडेसे पाणी टाकून भाजीवर झाकण ठेवावे. मंद गॅसवर भाजी तीन चार मिनिटे शिजू द्यावी. त्यानंतर भाजीवरील झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यावी. तुमच्या गरजेनुसार ती पातळ किंवा घट्ट हवी त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यावे. चलो ! हो गयी आपकी सब्जी तैय्यार !! पालेभाज्या तुम्हाला मिळणार आहेत दोन ते तीन प्रकारच्या मसाल्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे एकाच प्रकारची भाजी वेगवेगळ्या चवीमध्ये तुम्हाला चाखायला मिळणार. या शिवाय भाजी कशी करायची याचे मार्गदर्शन फोनवरून सुद्धा दिले जाते बरं का. त्यामुळे कुठे काही चुकण्याची भीतीच नाही.

आता या प्रकारात कोणत्याही गृहिणीला ‘इन्स्टंट व्हेजीज’ने आळशी केलेले नाही, किंवा तिचा स्वयंपाकाचा आनंद देखील हिरावून घेतलेला नाही. हॉटेलच्या तेलकट भाज्या खाऊन वैतागलेल्या नवरोबांच्या आणि एकूणच संपूर्ण कुटुंबाच्या हेल्थची काळजी देखील घेतली आहे.

आता ही अफलातून कल्पना कोणाच्या डोक्यात आली ते जाणून घेऊ या ! पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये राहणारे मुरलीधर साठे व्यवसायाने उद्योजक. परंतु स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे त्यांचे पॅशन. रोज एकदातरी स्वयंपाकघरात जाऊन फक्कड टेस्टी भाजी केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. नॉनव्हेज आणि व्हेज पदार्थांचे फ्युजन म्हणजे तर मुरलीधर साठे यांची खासियत. ‘इन्स्टंट व्हेजीज’बद्दल बोलताना मुरलीधर साठे म्हणाले, ” महाविद्यालयीन काळामध्ये मोठ्या कष्टाने शिक्षण घेत असताना स्वतःचा स्वयंपाक स्वतःला करावा लागत असे. सुरुवातीला स्वयंपाकाचा कंटाळा येत असे. पण पुढे त्यामध्ये गोडी वाढली आणि त्यातून नवनवीन पदार्थ करण्यास शिकून मित्रांना खाऊ घातले. मी केलेले पदार्थ त्यांना देखील आवडू लागले. पुढे हीच आवड माझे पॅशन कसे झाले हे मलाच कळले नाही. मला स्वतःला चविष्ट खाण्याची आवड असल्यामुळे त्या आवडीमधूनच रोज नवनवीन चवीचे पदार्थ बनवणे, वेगवेगळे प्रयोग करून काहीतरी नवीन पदार्थ सादर करणे आणि मित्रमंडळींना खाऊ घालणे हा माझा शौक झाला. माझ्या हातचा स्वयंपाक चाखून अनेक मान्यवरांनी आपली बोटे चाटली आहेत. भरभरून कौतुक केले आहे. या सगळ्यांच्या आग्रहामुळे माझ्या डोक्यात डोक्यात ‘इन्स्टंट व्हेजीज’ची अफलातून कल्पना आली”

आज ‘इन्स्टंट व्हेजीज’ची सेवा पिंपरी- चिंचवड शहरापुरती मर्यादित असली तरीही भविष्यात पुणे आणि जवळपासच्या इतर भागामध्ये देखील ही सेवा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. चला, तर मग ‘इन्स्टंट व्हेजीज’ला तुमच्या घरी आणण्यासाठी अँप केंव्हा डाउनलोड करताय ? स्वयंपाक करा…….. पण थोडासा हटके….. !!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like