RTO News : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कामकाजाबाबत प्रशासनाकडून निर्देश जारी

 नवीन नोंदणी, वाहन विषयक कामकाज नव्याने स्वीकारले जाणार नाही

एमपीसी न्यूज – राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 8.00 ते दिनांक 1 मे 21 रोजी सकाळी 7.00 पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत सूचना व निर्देश जारी केले आहेत. केंद्र शासनाने 1 फेब्रुवारी 2020 नंतर मुदत संपणारी योग्यता प्रमाणपत्रे, परवाना, अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्रासाठी 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्य शासनाने लागू केलेल्या विविध अटींमुळे परिवहन कार्यालयातील कामकाजाच्या संदर्भात बदल करण्यात आले आहेत –

नवीन नोंदणी – अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन 4.0 प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटर वाहन निरीक्षकाने अप्रूव्ह केले आहे अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील.

वाहन विषयक काम – वाहन 4.0 प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण केली जातील. नव्याने कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण – अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही.

_MPC_DIR_MPU_II

परवाना विषयक कामकाज – वाहन 4.0 प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणारे सर्व परवाना विषयक कामकाज चालू राहणार.

शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती बंद राहील.

अनुज्ञप्ती विषयक इतर कामे सारथी 4.0 प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण केली जातील. नव्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अंमलबजावणी विषयक कामकाज – अंमलबजावणी पथकाकडून रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी होणार आहे.

# वाहन अधिग्रहणाचे कामकाजाला प्राथमिकता दिली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खाजगी प्रवासी बस मधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत covid appropriate behaviour मध्ये जारी केलेल्या सूचनांप्रमाणे केली जात असल्याची खात्री परिवहन कार्यालयाकडून करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे चालू राहणार आहे.

# ऑनलाईन पध्दतीने अर्जदाराच्या उपस्थितीविना शक्य असणारी कामे सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.